बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…

नवी दिल्ली | ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाचपेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे.

पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातले निर्देश दिले आहेत.

वाइन शॉप्स, पानाची दुकानं फक्त ग्रीन झोनमध्येच उघडली जाणार आहेत. यामध्ये राज्यातील उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने वाईन शॉप सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी वाईन शॉपवर सोशल डिन्स्टन्सिंगचं पालन करावे लागणार आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र दिनी केंद्राचा महाराष्ट्राला धक्का; आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवलं

तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? वाचा संपूर्ण यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More