बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यातील तळीरामांसाठी खुशखबर; मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरु राहणार

पुणे | पुणे जिल्ह्यातील निर्बंध सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे महापालिकेने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात प्रशासनाने मद्यप्रेमींसाठी चांगली बातमी दिली आहे.

पुण्यात मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार आहेत. तसेच रेस्टॉरंट, बारदेखील रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  पुण्यातील मॉल, अभ्यासिका, ग्रंथालय 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर लग्न सभारंभासाठी 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात सरसकट दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. तर पुण्यातील पीएमपी बससेवाही आजपासून 100 टक्के क्षमतेने सुरु होणार आहे. सार्वजनिक बस वाहतूक सुरु झाल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.16 टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

वाचा नवीन नियमावली

  • व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. मात्र, सदर ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही.
  • विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
  • कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  • अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
  • मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
  • सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.
  • मॉल 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
  • सोमवारपासून आस्थापनांना सायं. 7 पर्यंत सुरु ठेवता येणार.
  • अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
  • रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
  • पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
  • ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
  • अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
  • उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस स. 5 ते 9 व दु. 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

थोडक्यात बातम्या- 

“…तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जायला मागे पुढे पाहणार नाहीत”

दिग्गज धावपटू मिल्खा सिंह यांच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन

पुणेकरांना दिलासा; आजपासून आणखी नियम शिथिल होणार, वाचा नव्या गाईडलाईन्स

जगभर थैमान घातलेल्या कोरोना मातेचं मंदीर जमीनदोस्त

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात आज एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यु नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More