देश

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली |  लॉकडाऊन असलेल्या अर्थव्यवस्थेला कराच्या माध्यमातून दिलासा मिळावा यासाठी दारूची दुकाने चालू ठेवण्यात यावीत, अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने होऊ लागली आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट नकार देत लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

केंद्रिय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार दारूची दुकाने बंद राहणार आहेत. दुकाने जर उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला तर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची भिती गृहीत धरून हा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दारूची दुकाने उघडी ठेवण्याला केंद्र सरकारडे परवानगी मागितलेली होती. मात्र केंद्राने अशी परवानगी द्यायला विरोध दर्शवत दुकाने उघडी ठेवता येणार नाही, असं म्हटलं. महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांनी तशी मागणी केली होती. मात्र महाराष्ट्र शासनाने यावर आणखी कोणताही निर्णय घेतलेला नाही.

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस शिवाय ग्रीन झोनमधील इतर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आदेशाची वाट बघणार असल्याचं दुकानदार संघटनेने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुस्लिम बांधवांना शुभेच्छा… रमजानमुळे समाजातील बंधुभाव अधिक दृढ होईल- उद्धव ठाकरे

दारू पिणाऱ्यांचं दु:ख राज ठाकरेंनी सरकार दरबारी मांडलं, व्वा ‘राज’बाबू व्वा…; संजय राऊतांचे शालजोडीतून टोले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या