दारूड्यांसाठी खुशखबर…दारूची दुकानं आता सकाळी 8 वाजताच उघडणार!

मुंबई | दारूड्यांसाठी खुशखबर आहे. कारण आता दारूची दुकानं सकाळी 10 ऐवजी 8 वाजता उघडणार आहेत. गृहविभागाने त्याबाबतचा जीआर काढला आहे.

दारूची दुकानं सकाळी ग्रामीण भागात सकाळी 10 ते रात्री 10, तर शहरी भागात दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत उघडी ठेवायला परवानगी होती. मात्र आता दोन्ही ठिकाणी सकाळी 8 ते रात्री 10 उघडी ठेवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलाय.

रात्री 12 पर्यंत दुकानं उघडी ठेवल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याच्या घटनाही घडत होत्या त्यामुळं हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रचारासाठी गेलेल्या भाजप आमदाराला तरूणाने कानफडात लगावली!

-मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रामाणिक नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

-वेळ पडल्यास अवनीच्या बछड्यांनाही बेशुद्ध पाडू- अवनीचा शिकारी

-‘पिहू’च्या अभिनयाने अंगावर शहारे येतात; अमृता फडणवीसांकडून कौतुक!

-अनिल गोटे भाजपची वाट लावणार; पत्र लिहून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त