बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी भारताच्या 15 शिलेदारांची फौज सज्ज; दोन द्विशतकं करणाऱ्या खेळाडूला वगळलं

मुंबई | भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी आपला संघ जाहीर केला असून विराटसेना कसोटी जेतेरपदसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली लंडन दौऱ्यासाठी बीसीसीआयनं 20 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यापैकी 15 जणांची निवड ही 18 जूनपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आहे. मात्र यामध्ये एका महत्त्वाच्या खेळाडूला वगळण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भारतानं सलामीवीर रोहित शर्मासह सलामीला शुबमन गिलला संधी दिली आहे. त्यामुळे मयंक अग्रवालला बाहरे बसावं लागलं आहे. मयंक अग्रवालने या स्पर्धेत 12 सामन्यात 20 इनिंगमध्ये 43 च्या सरासरीने 857 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मयंकच्या या 3 शतकांमध्ये दोन द्विशतकं आहेत. मयंकने या स्पर्धेत चेतेश्वर पुजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तरीही त्याला बाहेर बसवण्यात आल्याने क्रीडाप्रेमी नाराज झाले आहेत.

रिषभ पंत आणि वृद्धीमान सहा या दोन्ही यष्टिरक्षकांचा समावेश केला गेला आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहम्मद सिराज या पाच जलदगती गोलंदाजांचा 15 खेळाडूंमध्ये समावेश केला आहे.

दरम्यान, अष्टपैलू आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी संघात कायम आहे. त्यामुळे अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरला बाकावर बसवलं आहे. शार्दूल ठाकूर आणि मयांक अग्रवाल यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘सुशांतने 10 वाजून 10 मिनिटांनी…..’; एक वर्षभरानंतर समोर आलं सुशांतच्या मृत्यूचं कारण

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

“भाजप आणि आरएसएसने श्रीरामांच्या नावावर वर्गणी गोळा करण्याचा धंदा चालवलाय”

“अजित पवारांनीच अधिकाऱ्यांच्या करिअरवर गाढवाचा नांगर फिरवण्याचं काम केलंय”

निलेश राणे आणि संजय काकडेंनी तब्बल इतक्या लाखांची पाणीपट्टी थकवली, पुणे महापालिकेने धाडली नोटीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More