विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांची यादी आली समोर!

Maharashtra

Maharashtra l विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय उमेदवारांसह कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशातच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, राज्यात महायुतीला सर्वात जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून जोरदार लढत होणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. परंतु, राज्यात नेमके कोणते अपक्ष उमेदवार विजय मिळवू शकतात हे आपण जाणून घेऊयात…

अपक्षांकडे फिल्डिंग लावायला सुरूवात :

राज्यात विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. परंतु,राज्यात अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची देखील मदत घ्यावी लागणार आहे.

त्यामुळे मनसे, वंचित, शेकाप, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. मात्र आता कोणत्या मतदारसंघात अपक्षांच्या विजयाची शक्यता वर्तवली जात आहे हे आपण पाहुयात…

Maharashtra l राज्यात विजयाची शक्यता असलेले अपक्ष उमेदवार कोणते? :

रवी राणा – बडनेरा
समीर भुजबळ – नांदगाव
विजय चौगुले – ऐरोली
राहुल जगताप – श्रीगोंदा
सत्यजीत पाटणकर – पाटण
राजेंद्र मुळक – रामटेक
सुधाकर घारे – कर्जत, रायगड
रमेश आडसकर – माजलगाव
राजेश लाटकर – कोल्हापूर उत्तर
भिमराव धोंडे – आष्टी पाटोदा

News Title – List of independent candidates likely to win in assembly elections

महत्त्वाच्या बातम्या-

‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई?

अजित पवार ‘या’ तारखेला CM पदाची शपथ घेणार; बड्या नेत्याचा दावा

सोन्याचा दरवाढीला कौल, दोनच दिवसांत झाली ‘इतक्या’ हजारांची वाढ; पाहा आजच्या किंमती

महाविकास आघाडीला बहुमत मिळणार?, आणखी एका एक्झिट पोलचा निकाल समोर

देवी लक्ष्मी ‘या’ राशीची झोळी सुख व पैशांनी भरवणार?, वाचा राशीभविष्य

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .