बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये!

नवी दिल्ली | गेल्या काही वर्षात कोरोना महामारीमुळे राज्यामधील तसेच देशातली परिस्थिती खुप भयानक झाली होती. प्रत्येक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. अशातच आता देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामांचा सर्वे ‘इंडिया टुडे’ने जाहीर केला आहे. त्या सर्वेक्षणात भाजपच्या फक्त दोनच मुख्यमंत्र्यांच्या समावेश आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या यादीमध्ये 3 रा क्रमांक आहे.

इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात देशातील पहिल्या 11 लोकप्रिय मुख्यमंत्राच्याच्या यादीमध्ये 9 मुख्यमंत्री हे भाजप पक्षाचे नाहीत. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फक्त 29 टक्के लोकांची पंसती मिळाल्याने सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्रांच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर तामिळनाडूचे एम. के स्टॅलिन पहिल्या क्रमांकावर. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना दुसऱ्या क्रमाकं मिळाला आहे. तर केरळचे पिनराई विजयन, उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अनुक्रमे तिसरा, चौथा, आणि पाचव्या क्रमाकांवर लोकांनी पसंती दिली आहे. अकरा जणांच्या यादीमध्ये भाजपच्ये हेमंत बिस्वा आणि योगी आदित्यनाथ यांनाच स्थान मिळालं आहे.

दरम्यान, इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही लोकप्रियतेत घट होताना दिसत आहे. त्यांची लोकप्रियता एकाच वर्षांत 66 टक्क्यांवरून 24 टक्के झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 38 लोकांनी पंसती दर्शवली होती. तर ऑगस्ट 2020 मध्ये मोदींची लोकप्रियता 66 टक्के होती. याअगोदर घेतल्या गेलेल्या सर्वेक्षणात लोकांनी सार्वधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पंसती दिली होती.

 

थोडक्यात बातम्या-

“तुमचं जेवढं वय झालंय ना तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द आहे”

“बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी येणार, अफगाणिस्तानवरुन तालिबानी नाहीत”

अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी वाट्टेल ते; विमानाच्या आतले फोटो धक्कादायक

‘त्यांनी टीका केली म्हणून मी…’; शरद पवारांच्या टीकेवर राज्यपालांची प्रतिक्रिया

विधान परिषदेतील 12 आमदारांची नियुक्ती का रखडली?, मोठं कारण आलं समोर   

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More