बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऐकावं ते नवलच! चक्क कुत्रा करतोय डोंबाऱ्याचा खेळ, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर पशु़-पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्रेरणा देणारे असतात, तर काही व्हिडीओ असे असतात की, त्यांना पाहिल्यानंतर आपल्या अंगावरच एकदम काटा येतो. आपण याआधी प्राण्याचेही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्यामध्ये कधी एक प्राणी दुसऱ्या प्राण्याची शिकार करताना दाखवलेले असते. तर कधी कधी दोन प्राण्यांमधील हाणामारी दाखवलेली असते.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, कुत्रा हा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. तो खूप चाणाक्ष असतो. तसेच तो आपण जे शिकवू  ते तो लगेचच शिकतो. परंतू याआधी तुम्ही कुत्र्याला एका उंच दोरीवर चालताना पाहिलं आहे का. नसेल पाहिलं. तर सध्या याच संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये कुत्रा चक्क डोंबाऱ्याचा खेळ करत असल्याचं दिसत आहे. एक कुत्रा रोडवर असलेल्या लाईटच्या खांबांवरील वायरवर चढला आहे. तो एवढ्या उंचावर कशाचाही न आधार घेत उभा असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. तो त्या वायरवर नुसता उभा राहिला नाही. तर तो कुत्रा त्या वायरवरून चालत असल्याचंही दिसून येत आहे.

कुत्र्याचा हा व्हिडीओ पाहून अनेक जणांना आश्चर्याचा धक्काच बसला असल्याचं समजत आहे. त्याचप्रमाणे कुत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी त्या व्हिडीओला कमेेंट देखील केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

काय सांगता! चक्क चिमणी करतीये स्केटिंग, पाहा व्हिडीओ

91 वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर यशस्वी मात; रूग्णालयातून डिस्चार्ज

“मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण; आरक्षणाबाबत भाजपचा दुतोंडी चेहरा”

धक्कादायक! मुलाचा बाप कोण हे शोधण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह काढला बाहेर

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More