बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

पुणे | सध्या राज्यात कोरोना आटोक्यात आला असला तरी कोरोना नियमांचे पालन सर्वांनी करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेला आज भेट दिली होती. त्यावेळी काही कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी जमले होते. त्यातील काही जणांच्या तोंडावर मास्क नसल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली.

कोरोना अजूनही पुर्णपणे संपलेला नाही. आता सगळं सुरु झालं आहे. काही सेवा सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी परवानगी दिली आहे. गाडी काढा आणि फिरा असं करु नका. जरा अजून काही महिने दम धरा. सध्याची स्थिती ही सेलिब्रेशन करण्याची वेळ नाही. जबाबदारीने वागा. बाहेर निघताना मास्क लावा. तसेच मास्क काढून बोलून नका, असं सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

अजित दादा एक सेकंदही मास्क काढत नाहीत. अजित पवारांचं सगळं ऐकता मग अजितदादांचे कोरोनाचे नियम का ऐकत नाही? कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी जास्त पाळा. सव्वा वर्षात किती जणांनी दादाचा चेहरा बघितलाय?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला आहे. तर नियम न पाळणाऱ्यांचं तिकीटच कापण्यात येईल, असं देखील त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं.

दरम्यान, त्यावेळी उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की, राष्ट्रवादी पण दावा करणार? असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार हे पवार साहेबांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयावर पवार साहेब एकदा बोलले की, त्या विषयावर आम्ही कोणी बोलत नाही.

थोडक्यात बातम्या-

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

‘या’ कारणामुळे बंगालमध्ये आदिवासी महिलेला नग्न करून संपूर्ण गावात फिरवलं; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

अबब! फक्त एका ट्विटमुळे उद्योगपती गौतम अदानी यांना एका दिवसात 1.03 लाख कोटींचा फटका

कधीकाळी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या ‘या’ अभिनेत्याकडे सध्या घर खर्च भागवण्यासाठीही पैसे नाहीत!

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More