बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक दिवस रिषभ पंत भारताचा सर्वोत्तम कर्णधार असेल”

मुंबई | दिल्ली कॅपिटल्स आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिषभ पंत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर त्यानं भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. काही वर्षातच त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवलं आहे. त्याची जगभरातून स्तुती होत असते. आता भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांनी रिषभ पंतची प्रशंसा केली आहे.

आपल्या चुका दुरुस्त करुन वेगात पुढे जाण्याचं कसब रिषभजवळ आहे. मागील काळात त्याने ते कसब संपूर्ण जगाला दाखवून दिलंय. कर्णधार चुका करतात, तशा चुका रिषभही करेल पण तो चुकांमधून शिकत जाईल आणि एक दिवस भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये रिषभचं नाव असेल, असं सुनिल गावस्कर म्हणाले आहेत.

पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये कमाल केली. सहाव्या सामन्यापर्यंत रिषभला कर्णधार पदावरुन प्रत्येक मॅच प्रेझेंटर प्रश्न विचारायचा, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊन रिषभ थकला होता. पण रिषभच्या खांद्यावर ऐनवेळी जबाबदारी देऊनही त्याने सर्वोत्तम कामगिरी केली. या चेहरा भारताचं भविष्य असेल, असं गावस्कर म्हणाले. ‘ये चिंगारी आग लगा सकती हैं’, असं म्हणत सुनिल गावस्कर यांनी रिषभ पंतचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, रिषभ पंत भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. आगामी कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिषभवर महत्वाची जबाबदारी असणार आहे. त्याने इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकार लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार का?, नवाब मलिक म्हणतात…

दुर्दैवी! ‘ही’ गर्भवती डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत लोकांना करत होती सतर्क, पाहा व्हिडिओ

“केंद्राने कातडी बचाव धोरण स्विकारु नये”; केंद्र सरकारच्या याचिकेवर टीका

दोन दिवसांपूर्वी रूग्णालयातुन बेपत्ता झालेल्या कोरोनाबाधित महिलेचा ‘या’ शहरात सापडला मृतदेह

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महाराष्ट्रातील ‘या’ देवस्थानचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More