बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लिव्ह-इन रिलेशनशिपला वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून पाहिलं पाहिजे”

नवी दिल्ली | पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात न अडकता सोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याची पद्धत अलिकडेच रूढ झाली आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपचा मुद्या देशात नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सर्वोच्च तसेच राज्यातील उच्च न्यायालयात देखील लिव्ह इन रिलेशनशिपबाबत भूमिका मांडली होती. अशातच आता अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखील आपली भूमिका मांडली आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिप आता आपल्या आयुष्याचा एक भाग झालं आहे. तसेच सर्वोच न्यायालयाने देखील अशा प्रकारच्या संबंधांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप संबंधांकडे आता सामाजिक मुल्यांपेक्षाही वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे. त्यातूनच या स्वायत्तेचा अविष्कार होतो, असा युक्तिवाद अलाहाबाद उच्च न्यायालयाने केला आहे.

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कुशीनगर आणि मीरतमधून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात न्यायमूर्ती प्रितींकर दिवाकर आणि आशुतोष श्रीवास्तव यांच्या द्विपक्षीय खंडपीठामध्ये सुनावणी सुरू होती. त्यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने यावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, लिव्ह-इन रिलेशनशिपला अजूनही समाजाने स्वीकारलं नाही. लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत समाजात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

“अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचं आमचं ध्येय”

“कलेक्टर आहे ‘तो’ शिवसेनेचा, सगळ्यांचे पैसे गोळा करतो”

“चौकशी सुरू असताना क्लिन चीटचं कमळ कसं उगवलं ?”

“2024मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी पहायचं असेल तर…”

सेनसेक्समध्ये मोठी घट! गुंतवणूकदारांना तब्बल ‘इतक्या’ कोटींचा फटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More