लालकृष्ण अडवाणी, मनेका गांधी, मनोहर जोशींना भाजपकडून मोठा झटका

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी भाजपने जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेत्री हेमा मालिनी आणि मनोज तिवारी यांचाही समावेश आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, मनेका गांधी आणि वरुण गांधी यांची नावं मात्र वगळण्यात आली आहेत. 

2014च्या लोकसभा निवडणुकीत हे चारही जण उत्तर प्रदेशातील भाजपचे स्टार प्रचारक होते. विशेष बाब म्हणजे भाजपने अडवाणी यांच्याप्रमाणेच मुरली मनोहर जोशी यांचही तिकिट कापलं आहे.

दरम्यान, भाजपने यंदाच्या निवडणुकीतून 75 वर्षाहून अधिक वय असलेल्या तब्बल दहा नेत्यांचं तिकिट कापलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रणिती शिंदेंना भाजपकडून अनेकवेळा ऑफर, सुशीलकुमारांचा गौप्यस्फोट

-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

-नितीन गडकरींच्या पाठीवर सुषमा स्वराजांचा हात!

-शिवसेनेचे नाराज नेते खासदार रविंद्र गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत

-…तरीही विखे पाटलांचं प्रमोशन; स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश