महाराष्ट्र मुंबई

शेतकऱ्यांसाठी सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा, जुलैअखेरपर्यंत….

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जुलैअखेरपर्यंत राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याची घोषणा केली. निधी अभावी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली होती. यामुळे 11 लाख 12 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली होती. आता याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकर्‍यांना जुलै अखेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील 11.12 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नाही, असं बाळासाहेब पाटलांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मात्र हे शेतकरी आपली कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत होते. आता राज्याच्या सहकार विभागाने या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै अखेपर्यंत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, असंही बाळासाहेब पाटलांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

महत्वाच्या बातम्या-

जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला…- उदयनराजे भोसले

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या