Top News

पंकजा मुंडेंचा नवा गट?; गोपीनाथ गडावर होणार मोठा निर्णय

बीड | भाजपच्या  नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार असण्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा मुंडे या भाजपचा नवा गट तयार करण्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.  गोपीनाथ गडावर येत्या 12 तारखेला जोरदार शक्तीप्रदर्शन होणार असल्याचंही बोललं जातंय.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामागे पक्षातील लोक असल्याचा दावा केला आहे. दोघांच्याबरोबर आता माजी मंत्री प्रकाश मेहताही नाराज असून, खडसे आणि मेहता गोपीनाथ गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे.

येत्या 12 डिसेंबरला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त  भगवानगडावर त्या आपल्या समर्थकांना भेटणार आहेत. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि 12 डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या आहेत. 

पंकजा मुंडेंच नाही, तर अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाहीत, असा खुलासा करावा लागला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या