Top News महाराष्ट्र मुंबई

सर्वांसाठी लोकल लवकरच होणार सुरु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोनाच्या संसर्ग रोगामुळं मार्च महिन्यापासून लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात अत्यावश्यक सेवेला परवानगी दिली गेली. परंतू आता लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

या बैठकीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळं गर्दी होणार नाही अशा पद्धतीनं लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मुख्य सचिव संजय पुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आदि अधिकारी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

प्रजासत्ताकदिनी जवानांच्या परेडनंतर शेतकऱ्यांची भव्य ट्रॅक्टर परेड

खडसे आरोपी नाहीत त्यांना फक्त चौकशीसाठी बोलावलं- ईडी

“राहुल गांधींना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर”

‘माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे…’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया

राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या