Top News देश

पश्‍चिम बंगालच्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयाने दिली ही आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | 11 नोव्हेंबरपासून पश्‍चिम बंगालमध्ये लोकल सेवा सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्‌विट करत ही माहिती दिली आहे.

पश्‍चिम बंगालमध्येही करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून लोकल सेवा बंद होती. त्याला आता परवानगी मिळाली आहे.

लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्‍चिम बंगाल सरकार आणि ईस्टर्न रेल्वेमध्ये नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतरच लोकल सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

करोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल, असं पियूष गोयल यांनी ट्‌विटमध्ये म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

दहावी-बारावीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरु करण्याचा विचार; वर्षा गायकवाड

स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या