Top News कोरोना मुंबई

‘या’ तारखेपासून सर्वसामान्यांसाठी सुरु होणार लोकल सेवा; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

मुंबई | सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा केव्हा सुरु होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिलेत.

लोकल सेवेसंदर्भात माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात तसंच मुंबईमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या नियंत्रणात येतेय. त्यामुळे आता दुसरी लाट येण्याची शक्यता मावळली असल्याचं दिसून येतंय.”

ते पुढे म्हणाले, “यामुळे लोकलसेवा सुरू होण्यामध्ये काही अडथळे असतील असं वाटत नाही. 31 डिसेंबरनंतर जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून मुंबईतील लोकलसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.”

दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यापूर्वी मुंबईची लोकलसेवा डिसेंबरमध्ये सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा महागला

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द!

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या