बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता ‘या’ प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची मागणी झाली मान्य

मुंबई | लोकलने प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन्ही डोस आणि युनिव्हर्सल पास असणं बंधनकारक आहे. त्यात तिकीट विक्री बंद असल्याने प्रवासी गोंधळात आहेत. या सगळ्यात रेल्वे प्रशासनाने काही प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परिक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. या परिक्षेशी संबंधित सर्वांसाठीच रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

एमपीएससीची परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा देत रेल्वे प्रशासनाने त्यांना लोकल प्रवासात मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. 30 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर हे दोन दिवस एमपीएससी परिक्षार्थी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तिकीट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पण यासाठी एमपीएससी परिक्षेचं ओळखपत्र सोबत ठेवणं अनिवार्य असणार आहे.

राज्य सरकारने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी परिक्षार्थी, पर्यवेक्षक, इतर अधिकारी व कर्मचारी प्रवास करणार आहेत. परिक्षेची तयारी व परिक्षेसाठी त्यांना 30 व 31 ऑक्टोबर रोजी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असं राज्य सरकारने पत्रात नमूद केलं होतं.

एमपीएससी परिक्षेशी निगडीत सर्वांना एक दिवस लोकल प्रवासाची मुभा द्यावी, ही राज्य सरकारची मागणी रेल्वे प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यासाठी परिक्षार्थ्यांना त्यांचं एमपीएससी परिक्षेचं ओळखपत्र व इतर कर्मचाऱ्यांनाही त्यांचं ओळखपत्र जवळ बाळगणं गरजेचं आहे. वैध असलेल्या ओळखपत्रासह या सर्वांना लोकलचं तिकीट देण्यात येणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

…तर या कायद्याप्रमाणे वानखेडेंची चौकशी होणार, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

किवींविरूद्ध भारताची मोठी रणनिती! ‘या’ दोन खेळाडूंना संघात संधी मिळण्याची शक्यता

मुंबई पोलिसांना सरकारकडून फक्त 750 रूपयांची दिवाळी भेट!

“…तर येणाऱ्या काळात मुलींमुळे मुलं बेरोजगार होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More