मुंबई | सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल सेवा केव्हा सुरु होणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना थेट पुढच्या वर्षीच करायला मिळणार असल्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेत.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या रुग्णसंख्येवर येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पालिका प्रशासनाची नजर असणार आहे. आकडेवारी आणि तेव्हाची परिस्थिती पाहिल्यानंतर लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवलं जाईल.
इक्बाल सिंह चहल पुढे म्हणाले, “येत्या 20 डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसंच नाताळ आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु.”
दरम्यान दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली नाहीये. मात्र तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाहीये. म्हणूनच मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावं, असे आवाहन देखील त्यांनी केलंय.
थोडक्यात बातम्या-
#Video- हार्दिक पांड्या म्हणतो; ….तर मुंबईत मराठीतच बोललं पाहिजे!
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या आजी आणि लहान भावाची निर्घृण हत्या
गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड
दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; मनीष सिसोदियांनी केला व्हिडीओ शेअर
मुंबईत डिसेंबरच्या थंडीमध्ये पावसाची हजेरी