बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पत्रकार परिषदेपूर्वी करूणा शर्मा मुलासह स्थानबद्ध; परळीत तणावाचे वातावरण

परळी | गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आला आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांना स्थानबद्द केल्याची माहिती समोर आली आहे. आज करूणा शर्मा पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार होत्या मात्र, पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केल्यानं आता नवीन वादाला सुरूवात झाल्याचं दिसतंय.

दोन दिवसांपूर्वी करूणा शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. आपण परळीत सासरी येऊन अनेक गोष्टींचा खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज करूणा शर्मा आपल्या मुलासोबत परळीत दाखल होताच त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आता परळीत तणावाचं वातावरण तयार झालं आहे.

आज सकाळी करूणा शर्मा बीडमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्या आज परळीत दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र, करूणा शर्मा दुपारी 2 वाजता परळीत पोहचल्या. परळीत दाखल होताच पोलिसांनी करूणा शर्मा यांना ताब्यात घेत स्थानबद्ध केलं आहे. त्यांच्या मुलाला देखील स्थानबद्ध केल्याचं कळतंय. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, करूणा शर्मा यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आल्यानं करूणा शर्मा यांच्यावर अँट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘… त्यांनी थोडसं तारतम्य बाळगावं’; शरद पवारांचा ‘त्या’ नेत्यांना सल्ला

‘डिवचू नका नाहीतर सोडणार नाही’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा

मोठी बातमी! रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण; भारतीय संघातील ‘हे’ तीन जण विलगीकरणात

आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“तो देश लुटायलाच आलाय, मी त्यांच्याबद्दल नाही, तर मनी हाईस्ट बद्दल बोलतीये”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More