Top News

मुंबईत लॉकडाउन कठोर होणार, SRPF आणि ड्रोनचीही मदत घेणार- राजेश टोपे

Loading...

मुंबई | मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रातल्या संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ज्या भागात आवश्यकता आहे तिथे लॉकडाउनचे नियम कठोर करण्यात येतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

पोलीस आणि इतर यंत्रणा त्यांचं काम अगदी योग्य पद्धतीने करत आहेत. मात्र आता SRPF अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकडीलाही पाचारण केलं जाईल. तसंच जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

SRPF ची मदत घेणं आता आवश्यक आहे. जे दाटीवाटीचे भाग आहेत तिथे SRPF बोलवणार आहोत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही आम्ही याबाबत सांगितलं आहे. लोक नियम पाळत आहेत की नाही हे पाहण्यासाठी आम्ही ड्रोन कॅमेराचीही मदत घेणार आहोत, असं टोपेंनी सांगितलंय.

दरम्यान, सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही लक्ष ठेवलं जात होतं. आता ड्रोनच्या मदतीनेही निरीक्षण केलं जाणार आहे. कंट्रोल रुमच्या मदतीने सीसीटीव्हीचा वापर करण्यात येत आहे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

आमदारांच्या वेतनातील 30 टक्के कपातीला ठाकरे सरकारची मंजुरी

‘भीकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर’; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महत्वाच्या बातम्या-

पिंपरीत कोरोना रुग्णात सारीची लक्षणं आढळल्याने खळबळ!

“कोरोना नियंत्रणात राहण्याचं पहिलं श्रेय मोदींनाच”

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या