बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

100 नंबरवर 77 हजार कॉल; लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल

मुंबई | राज्यात लॉकडाऊनदरम्यान 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत 69 हजार 374 गुन्हे दाखल झाले असून 14 हजार 955 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 77 हजार 670 फोन आले. त्यासर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 602 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे.

दरम्यान, अवैध वाहतूक करणाऱ्या 1084 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 45,168 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

गृहमंत्री अनिल देशमुखांनी आजीबाईंना स्वत: घातला मास्क

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंदच राहणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More