महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; डॉ. अविनाश भोंडवेंचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. (Corona) त्यामुळे जगभर खबरदारी घेतली जातेय. भारतानेही सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आता यावर आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Avinash Bhondave) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओमिक्रॉनचा (Omicron) हा सब व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट सौम्य समजला जात होता. पण त्याचा संसर्ग वेगाने होतो. हा मूळच्या कोरोनापेक्षा 18 पट वेगाने पसरतो. त्यामुळे तो अनेकांना वेगाने होतो. त्याची मारक शक्ती जास्त नाहीये. आता गेल्या काही दिवसात चीनमधून जे व्हिडीओ आलेत त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे, असं डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं.

मृत्यूची संख्या वाढली, खूप लोक बाधित झाले, रुग्णालय भरू लागले तरच लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. पण आताची जी परिस्थिती आहे त्यानुसार आजार वाढतो. मोठ्या प्रमाणात वाढला तरी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ येत नाही, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, या आजारापासून बचाव करायचा असेल तर आधीचेच प्रतिबंधक उपाय केले पाहिजेत. प्रतिबंधक उपाय म्हणजे गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा, हात स्वच्छ धुवा. पण लॉकडाऊन सारखा कठोर उपाय वापरला जाऊ शकणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या व्हायरसची लागण पटकन होते. तसेच ज्यांना मधूमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार आहे त्यांनाही या आजाराचा अधिक त्रास होतो, असंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-