Top News कोरोना

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाची घोषणा केलीये.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु अजून देखील आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे आपल्याला विसरुन चालणार नाहीये.”

“पूर्णपणे नाही मात्र राज्यात काही प्रमाणात नक्कीच संसर्गाला अटकाव करण्यात यश आलंय. मात्र कुटुंबप्रमुख म्हणून सावध राहा सांगणं हे माझं कर्तव्य आहे,” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

“ख्रिसमस तसंच लग्नसराई या काळात मास्क काढून सेल्फी काढले जातील. मात्र असं निष्काळजीपणाने वागून चालणार नाही. या लग्नसराईत गर्दी करत कोरोनाला ‘यायचं हं… म्हणू नका”, असं मुख्यमंत्री म्हणाले

थोडक्यात बातम्या-

माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

शिवसेनेसारखी कामं आपल्याला करायची नाहीत- चंद्रकांत पाटील

महाविकासआघाडीतील अंतर्गत पक्षांतरावर छगन भुजबळ म्हणाले…

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या