Top News देश

ही 13 शहरं अजूनही बंदिस्त राहणार, बाकीकडे लॉकडाऊन शिथील होणार…!

नवी दिल्ली | देशव्यापी चौथा लॉकडाऊन उद्या म्हणजेच 31 मे रोजी संपत आहे. केंद्र शासनाने पाचव्या लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स आखल्या आहेत. परंतू यामध्ये जिथे कोरोनाचा प्रसार नाही ती शहरं किंवा गावं आता मोकळा श्वास घेणार आहे. म्हणजेच तेथील लॉकडाऊन उठवला जाणार आहे.

‘इकोनॉमिक टाईम्स’नं दिलेल्या माहितीनुसार, देशातील फक्त 13 शहरं सोडून देशातील इतर भागांची मात्र लॉकडाऊनमधून सुटका होऊ शकते. मुंबई, चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, ठाणे, पुणे, हैदराबाद, कोलकाता, इंदौर, जयपुर, जोधपूर, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर या शहरांत मात्र लॉकडाऊन कायम असणार आहे. ही 13 शहरं सोडून ज्या भागात कोरोनाचा प्रसार किंवा प्रादुर्भाव नाहीये त्या ठिकाणची हॉटेल्स, मॉल्स तसंच रेस्टॉरंट सुरू केली जाऊ शकतात, अशी माहिती कळतीये.

गुरूवारी अमित शहांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन संबंधी चर्चा केली. त्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत एक बैठकझाली. या बैठकीत लॉकडाऊन 5.0 बाबत गाईडलाईन्स आखल्या गेल्याची माहिती आहे.

1 जूनपासून सार्वजनिक वाहतूक सेवा सोशल डिस्टन्सिंगच्या आणि अन्य नियमांसहित सुरू केली जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्याबद्दल काही मुद्दे स्पष्ट करू शकतात.

ट्रेंडिंग बातम्या-

जिल्ह्याची हद्द ओलांडणं संभाजी भिडेंना महागात; पोलिसांत गुन्हा दाखल

राज्यात आज 8381 रूग्ण ठणठणीत होऊन घरी… बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आज उच्चांक!

महत्वाच्या बातम्या-

लस शोधली तरी…. कोरोनाबाबत धक्कादायक माहिती समोर

शाळा कधी सुरू होणार?, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

प्रशिक्षणाचा नागपूर पॅटर्न ठरला यशस्वी…!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या