बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लाॅकडाऊन करूनही फारसा फायदा झाला नाही’; हसन मुश्रीफांचं धक्कादायक वक्तव्य

मुंबई | कधी नव्हे ते कोरोना काळात अनेकांनी घरात बसून दिवस काढले आहे. सर्वांनाच बाहेर जाण्याची इच्छा होत आहे. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आणि सरकारने लागू लाॅकडाऊन केल्यानं अनेकांना घरीच बसावं लागलं होतं, लाॅकडाऊनमुळे 60 हजाराच्या घरात असलेले रूग्णसंख्या आता 20 हजाराच्या आत आली आहे. मात्र यातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राज्यात लॉकडाऊन करुनही फारसा फायदा झाला नाही. आता अनलॉकमध्ये नागरिकांना खबरदारी घेणे आवश्यक आहे, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोरोनाची पुढची लाट मोठी असू शकते. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज आहे. या लाटेत लहान मुलं विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. दुकानं उघडली की लोकं जीवघेणी गर्दी करतात, ते टाळलं पाहिजे. नियोजन करुन वस्तू खरेदी कराव्यात, असा सल्ला देखील हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. त्याच बरोबर त्यांनी केंद्र सरकारवर देखील कडक शब्दात टीका केली आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघेही गुजरातचे आहेत. त्यांचे नरेंद्र मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांवरही कारवाई केली जात नाही. परदेशी गेलेल्या तपास यंत्रणा हात हलवत येणार हे माहिती होतं, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 60 हजारावर असलेली रूग्णसंख्या कमी झाली असली तरी, राज्याला मोठा आर्थिक भार सोसोवा लागत आहे. देशासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांना या लाॅकडाऊनचा फटका बसलेला दिसत आहे. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत.

थोडक्यात बातम्या-

उपराष्ट्रपती नायडुच नाही तर RSS नेत्यांचीही ब्लू टिक ट्विटरनं हटवली!

बहुचर्चित Hyundai Alcazar कारची प्रतिक्षा संपली; जाणून घ्या नव्या दमदार 7 सिटर गाडीचे फिचर्स

पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘शंभर टक्के सांगतो ती चूकच होती’

राज-उद्धव एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मराठा मोर्चा निघणारच’, विनायक मेटे आक्रमक; बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More