बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी तीन दिवसांचा लॉकडाउन वाढवला

बीड | कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील बीड जिल्ह्यात लॉकडाउनची तारीख संपायला आलेली मात्र तरीही कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी न झाल्याने जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

बीड जिल्हा प्रशासनाने 4 मे रोजी 3 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली होती.  या काळात जर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येईल, असं बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितलं होतं. मात्र रूग्णसंख्येत घट झाली नसल्याने जगताप यांनी जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला.

रुग्णसंख्येत घट न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 12 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत फेरीवाल्यांना तसेच भाजीपला विक्री करण्यास करण्यास परवानगी असल्याचं रविंद्र जगताप यांनी म्हणाले.

दरम्यान, सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवार-सुप्रिया सुळे यांचा मुंबईत फेरफटका, पाहा शरद पवारांचा लाईव्ह व्हिडीओ

राष्ट्रवादीनं पुण्याचा शहराध्यक्ष बदलला, ‘या’ नेत्याला दिली संधी

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन

दिलासादायक! पुण्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या आजची आकडेवारी

‘कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मानले आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More