नवी दिल्ली | केंद्र सरकारकडून देशभरातील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये कन्टेन्मेंट झोनबाहेरील व्यवहार तीन टप्प्यात सुरु होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
कोणते आहेत तीन टप्पे आणि कोणत्या गोष्टी केव्हा सुरु होणार?-
पहिला टप्पा-
धार्मिक स्थळं, सार्वजनिक प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि इतर सेवांसह शॉपिंग मॉलचा यामध्ये समावेश आहे. 8 जूनपासून या गोष्टी खुल्या करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दुसरा टप्पा-
शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था राज्य सरकारांशी चर्चा करुन जुलै 2020 मध्ये खुल्या करता येणार आहेत. राज्य सरकार यावर निर्णय घेण्यासाठी संस्था आणि पालकांशी देखील चर्चा करु शकेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
तिसरा टप्पा-
गृहमंत्रालयाने निश्चित केल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो रेल्वे, सिनेमागृहं, व्यायामशाळा, स्विमिंगपूल, बार आणि इतर तत्सम ठिकाणं खुली करण्याविषयी तिसऱ्या टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे. याच्या तारखा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत, मात्र परिस्थितीचा आढावा घेऊन त्या नंतर घोषित केल्या जातील.
ट्रेंडिंग बातम्या-
देशातील ‘या’ झोन्समध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; केंद्र सरकारकडून नियमावली जारी
केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्सनूसार काय बंद राहणार, काय उघडणार?
महत्वाच्या बातम्या-
उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस
ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…
“राज्याला केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही”
Comments are closed.