देश

देशातील ‘या’ झोन्समध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला; केंद्र सरकारकडून नियमावली जारी

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे.

प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊन घोषित केला होता. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता. मग त्यामध्ये वाढ करुन तो तीन मे पर्यंत वाढवण्यात आला. भारतातील कोरोना वाढतच गेल्याने हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला.

 ट्रेंडिंग बातम्या-

उद्धवजी माझ्या मोठ्या भावासारखे आहेत त्यामुळे मी त्यांना…-देवेंद्र फडणवीस

वर्षभरापासून देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकार कुठे कमी पडतंय?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“राज्याला केंद्राकडून सहकार्य मिळालं नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही”

सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या