बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढला; 15 मे पर्यंत अंमलबजावणी कायम

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर, 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 1 मे रोजी सकाळी 7 वाजता हा लॉकडाऊन संपणार होता.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी तसेच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन याच नियमावलीसह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

15 मे पर्यंत महाराष्ट्रात यापूर्वी जे नियम लागू करण्यात आले होते, तेच नियम लागू असणार आहेत. तसेच कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आटोकाट प्रयत्न करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लॉकडाऊन काळामध्ये आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास ई-पास जवळ बाळगणे बंधनकारक असणार आहे.

लग्न समारंभासाठी पूर्वीप्रमाणेच 25 लोकांनाच उपस्थित राहण्याची मुभा राज्यभरात असणार आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. त्याबरोबरच, अत्यावश्यक सेवेत काम करणारी व्यक्ती आणि अत्यावश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडू शकतात. त्यामुळे आता 1 तारखेला लॉकडाऊन उघडणार या आशेवर असणाऱ्या लोकांना 15 मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या

फुफ्फुसांव्यतिरिक्त ‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोनाचा नवा स्ट्रेन, वेळीच व्हा सावध!

तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं…- हेमंत ढोमे

कोरोनातून बरे झालेल्यांनी लस घ्यावी की नाही?; तज्ज्ञांनी दिला हा मोलाचा सल्ला; म्हणाले…

“मुंबईत ‘इतके’ लसीकरण राहणार बंद”; अतिरिक्त आयुक्तांनी दिली माहिती

पंतप्रधानांनी बोलवली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More