बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; ‘या’ तारखेला येणार नवी नियमावली

पुणे | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जून पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन घोषित केला होता. 1 जूननंतर लॉकडाऊन उघडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी होत असताना पॉझिटिव्हिटी रेट अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

आज महाराष्ट्रातील कोरोना आढाव्याची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत केलेल्या घोषणेमुळे 1 जूननंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन पूर्णपणे उघडणार या अपेक्षेवर असलेले नागरिक काही प्रमाणात निराश झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली 1 जूनला जाहीर करण्यात येईल. तसेच शिथीलतेबाबत स्थानिक प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्णपणे अधिकार दिले जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने रुग्णालयाचं प्रत्येक बिल आता तपासलं जाईल, असं आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘आम्हाला कोणाच्याही भांडणात रस नाही, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?’; संभाजीराजे कडाडले

बोलण्यास नकार दिल्यानं अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं केले वार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार

विवाहितेनं ‘या’ कारणामुळं सॅनिटायझर पिऊन केली आत्महत्या; नवऱ्याने तिच्या मृत्यूनंतरही केलं लाजीरवाणं कृत्य

‘खाकी’तली माणुसकी! रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या महिलेची आणि तिच्या बाळाची महिला काॅन्सटेबलनं केली मदत

धक्कादायक! सेक्स करण्यास नकार दिल्यानं पतीने केली पत्नीसह आपल्या तीन मुलांची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More