बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन?; महापौरांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

पुणे | कोरोनाच्या (Corona) नवनवीन व्हेरियंटनं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अशातच ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरियंटनं हाहाकार माजवायला सुरुवात केली असून याचा संसर्ग वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आणि वाढता संसर्ग याच्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यातं तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता आता राज्यात महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमावर राज्यात लाॅकडाऊन केलं जाईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहे. अशातच आता पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ (Murlithar Mohol) यांनी लाॅकडाऊनविषयी सूचक वकतव्य केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध सक्तीनं पाळण्यात यावं, असा निर्णय घेणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे. याशिवाय पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीनं पोहोचणंही तिकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं थैमान माडलं आहे. अशातच ओमिक्राॅनचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे ही संख्या जर अशीच वाढत राहिली तर लाॅकडाऊनची परिस्थिती उद्भवू शकते.

थोडक्यात बातम्या –  

बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार, अभिजित बिचुकलेची ‘या’ अभिनेत्रीसोबत हमरीतुमरी

Omicron विरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील परिणामकारक

Omicronचं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, अजिबात दुर्लक्ष करु नका!

Omicron बाबत दिलासादायक माहिती, अशी वाढेल रोगप्रतिकारशक्ती

Corona: हिवाळी अधिवेशनात हजेरी लावलेल्या ‘या’ दोन आमदारांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More