मुंबई | राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन पडणार असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फार मोठी संख्या वाढली आहे अशातला भाग नाही. पुन्हा थोडीफार कमी होते. त्यामुळे अडीच-तीन हजारांच्या दरम्यान दररोजची संख्या वाढण्यामागचं प्रमाण मागील दोन-तीन महिन्यांपासून आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्या भागात लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
काळजी घेण गरजेचं आहे कोरोना बाधितांचा आकडा काही प्रमाणात वाढू लागला आहे. स्थानिक जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन नाही पण नियमांची कडक अंमलबजावणी होणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, लोक मास्क घालणार नसतील किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘आमच्या वाटेला जाल तर…’; राणे समर्थकांचा विनायक राऊतांना इशारा
…नाहीतर काँग्रेस लवकरच इतिहास जमा होईल- चंद्रकांत पाटील
‘त्या’ पीडितेचा आत्महत्या करण्याचा इशारा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या अडचणी वाढणार?
मित्राच्या लग्नात तो बनला मोर; ‘नाच रे मोरा आंब्याच्या बनात’ डान्स व्हायरल