बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा लॉकडाऊन आणखी वाढवला

सातारा | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश राज्यभरात लागू केले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊनची तसेच काही ठिकाणी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वीच साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी लॉकडाऊन संपूर्ण सातारा जिल्ह्यात लावण्याची घोषणा केली होती. सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हा निर्णय घेतला होता.

सातारा जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, लॉकडाऊन लावल्यानंतरही कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने पालकमंत्र्यांनी बैठक घेऊन लॉकडाऊन वाढवण्या संदर्भात आदेश दिले आहेत.

पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यामध्ये आता वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा 5 दिवस आणखी बंद राहणार आहे. नविन आदेशानुसार आता 15 मे पर्यंत सातारा जिल्हा संपूर्णतः बंद राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

मालदीवमध्ये दारु पिऊन वॅार्नर आणि स्टेलर यांच्यात जोरदार हाणामारी?, स्टेलरनं दिलं स्पष्टीकरण

“मदतीची विमानेच्या विमाने येत आहेत, ती नेमकी कुठे जात आहेत याचा खुलासा केंद्राने करावा”

“कोरोनाच्या लाटेत महाराष्ट्र सरकारकडून इतरांनी काहीतरी शिकायला हवं”

जगप्रसिद्ध ‘लॅन्सेट’चा कोरोनाबद्दल धक्कादायक दावा, मोदी सरकारवर जोरदार टीका

पंढरपूरच्या निवडणुकीनं घात केला, कोरोनानं एकाच कुटुंबातील चौघांचा बळी घेतला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More