Top News महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊन शिथील… मात्र आणखीही आपल्याला या गोष्टी करण्यास वाटच पाहावी लागणार…!

मुंबई |   कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तब्बल 70 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन आता हळूहळू संपुष्टात येत आहे. कन्टेनमेंट झोन सोडून बाकी इतर भातात आता काही नियम वगळता बाकी लॉकडाऊन शिथील केला आहे. यामध्ये बऱ्याच बाबींना सूट दिलेली आहे मात्र आणखीही बऱ्याचश्या गोष्टींना शासनाने परवानगी दिलेली नाहीये.

सर्वांत प्रथम म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवेला शासनाने आणखीही परवानगी दिलेली नाहीये. त्यामुळे राज्यातील नागरिक दुसऱ्या देशांत जाऊ शकत नाहीत किंबहूना प्रवास करू शकत नाही. दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातली मेट्रो सेवा देखील तूर्तास बंदच ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे. मुंबई, नागपूर या ठिकाणची मेट्रो गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे. ती आता देखील बंदच राहणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रवासासाठी सर्वसामान्यांना आणखीही वाट पाहायला लागणार आहे.

शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार असल्याचं शासनाने जाहीर केलं आहे. तसंच स्विमिंग पूलमध्ये देखील तूर्तास जाता येणार नाही. जिममध्ये जायला देखील परवानगी देण्यात आलेली नाहीये.  सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघायला देखील आणखी वाट पाहायला लागणार आहे. तसंच धार्मिक स्थळे देखील गर्दी होऊ नये म्हणून बंदच ठेवण्यात येणार आहे.

केंद्राने सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार जरी 8 मे पासून या गोष्टी सुरू ठेवण्याला परवानगी दिली असली तरी उद्धव ठाकरे सरकारने राज्यात या गोष्टी सुरू होणार नाहीत, असं म्हटलेलं आहे. तसंच परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेऊ, असंही त्यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

सॅनिटायझरचा अतिवापर करत असाल तर सावधान; होऊ शकतो ‘हा’ धोका!

महत्वाच्या बातम्या-

राज्याची नियमावली जाहीर, वाचा 3, 5 आणि 8 जूनला काय सुरू होणार तर कोणत्या गोष्टी बंदच राहणार…?

आर्थिक संकटात सापडलेल्या पुणेकरांना महापालिकेने दिली आनंदाची बातमी!

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या