मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात यावा; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या 2 दिवसात मुंबईत 1500 हून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या तीन महिन्यातील हा सर्वाधिक आकडा आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अंशत: लाॅकडाऊन करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी नुकताच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. असं बोलुन दाखवलं होतं. त्यामुळे मुंबईकरांवर पुन्हा एकदा निर्बंधांची टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत असतानाच आता माजी आरोग्यमंत्र्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्याकडुन काय प्रतिसाद मिळतोे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
शासनाकडून वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन करत नाही, मास्क वापरत नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अंशत: लाॅकडाऊन करण्याची गरज असल्याचं माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बोलुन दाखवलं आहे.
राज्यात रविवारी 11 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा हा वाढता उद्रेक जर नियंत्रणात आला नाही तर मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात अंशतः किंवा संपुर्ण कडक लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली आणि अनावश्यक ठिकाणी गर्दी करण्याचं टाळलं तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो.
थोडक्यात बातम्या-
“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”
मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!
तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!
#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या!
Comments are closed.