बीड | कोरोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकजण शहरात अडकून पडले आहेत. यामुळे गरीब, निराधार, हातावर पोट असणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ ओढवली आहे. घराबाहेर पडता येत नाही, मग खायचं काय? सांगायचे कोणाला? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीड तालुक्यातील पंचवीस गावांनी, दवंडी देऊन प्रत्येक घरातून दोन भाकरी जमा करीत दररोज तब्बल पाच हजार भाकरींचा डब्बा शहरात पाठवण्यास सुरु केल्याने मोठा दिलासा मिळाला.
बीड शहरासह सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून लॉकडाउन, संचारबंदी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यानंतर सरकारने नागरिकांना आहे त्याच ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला. बाहेरगावाहून शिकण्यासाठी, नोकरीसाठी शहरात खानावळींवर अवलंबून असलेल्या लोकांची जेवणाची अडचण निर्माण झाली.
शहरातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेत ‘जिओ जिंदगी’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना याची कल्पना दिली. लॉकडाउन संपेपर्यंत गरजवंतांना जेवण पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
…म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार
उद्यापासून ग्रीन आणि ऑरेंज झोननध्ये उद्योगांना परवानगी; जिल्हाबंदी कायम- मुख्यमंत्री
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकार पेन्शनमध्ये 20 टक्के कपात करणार की नाही?; अर्थखात्यानं दिलं स्पष्टीकरण
आपले कार्य निश्चितच चांगले आहे मात्र…; विनोद पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
लातूर जिल्हा कोरोनामुक्त, आठही प्रवासी रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह
Comments are closed.