औरंगाबाद महाराष्ट्र

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

बीड | राज्य सरकारच्या परवानगीनंतर बीड जिल्हा प्रशासनाने राजस्थानच्या कोटा येथे लॉकडाऊनदरम्यान अडकलेल्या 60 विद्यार्थ्यांना अखेर बीड शहरात आणलं आहे. कोटामध्ये अडकलेले बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी आज दुपारी दोन वाजता शहरात दाखल झाले.

एका खासगी ट्रव्हल्सने त्यांना राजस्थानातून बीड शहरात आणण्यात आलं. विद्यार्थी परत आल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बीड शहरात दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना बस स्थानकाच्या पाठिमागे असणाऱ्या रोडवर सोडण्यात आलं. तिथे शिवाजीनगर पोलीस आधीपासून दाखल झाले होते. पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं. चौकशीनंतर सर्वांना घरी सोडण्यात आलं.

राज्य सरकार या विद्यार्थांना परत आणण्यासाठी 100 एसटी बस सोडणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी काल दिली होती. त्यानंतर आज बीड जिल्ह्यातील 60 विद्यार्थी बीडमध्ये दाखल झाले.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

’20 हजार कोटी द्या’; अशोक चव्हाण यांची नितीन गडकरींकडे मागणी

दुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या