Top News महाराष्ट्र मुंबई

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई |  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिकाधिक फैलावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन देशात तसंच महाष्ट्रात असणार आहे. मात्र 15 एप्रिलपासून सर्वसामान्यांचं जीवन पुन्हा एकदा सुरू होईल का? लॉकडाऊन संपेल का? असे प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत. याच प्रश्नाचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.

लॉकडाऊन उठवण्याबाबत काही कार्यपद्धती आहे. लॉकडाऊन उठवायचा किंवा त्याचा कालावधी वाढवायचा याबाबत केंद्र सरकार एडव्हायजरी पाठवतं. आता येत्या 10 ते 15 एप्रिलदरम्यानच्या परिस्थितीचा अभ्यास करून आणि त्यावरून जी परिस्थिती आहे, त्याचा अभ्यास करुन तसंच केंद्राच्या एडव्हायजरीनुसार काम होईल आणि मगच लॉकडाऊन शिथिल होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

राज्यात आणि देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना देखील काही लोक हुल्लडबाजी करत आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ते ओळखू घ्यायला तयार नाहीत, अशी नाराजी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रातला कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाऱ्याच्या वेगात वाढताना दिसून येत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांनी 800 चा आकडा पार केला आहे. एकूण रूग्णांची संख्या 809 इतकी झाली आहे. तर एकट्या मुंबईत कोरोनाचे 491 रूग्ण आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन

‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

महत्वाच्या बातम्या-

इंग्लंडचे पंतप्रधान बोरेस जॉन्सन यांना ICU मध्ये हलवलं; 27 मार्चला कोरोना रिपोर्ट आला होता पॉझिटीव्ह

लॉकडाउन म्हणजे नोटाबंदीपेक्षा मोठी चूक- कमल हसन

मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या