मुंबई | महाराष्ट्र राज्यातला लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करत आहेत.
राज्यामध्ये आणि देशामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारांनी काय काय उपाययोजना केल्या आहेत, हे पंतप्रधान मोदी आजच्या बैठकीतून जाणून घेत आहेत. तसंच लॉकडाऊनसंबंधी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं नेमकं काय मत आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्राला विविध पातळ्यांवर केंद्राची मदत लागणार आहे. केंद्राने मदत करून सहकार्य करावे, अशी विनंती उद्धव यांनी मोदींकडे केली. तसंच मोदींनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं.
बहुतांशी मुख्यमंत्र्यांचं लॉकडाऊन वाढवावा, यावर एकमत असल्याची माहिती कळतीये. तर एका राज्यासाठी लॉकडाऊन आणि दुसऱ्या राज्यासाठी लॉकडाऊन शिथील करू नका. सगळ्या देशात एकच प्रणाली वापरली गेली पाहिजे, असं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
संजय राऊतांची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं; चंद्रकांत पाटलांकडून राऊतांचा समाचार
महत्वाच्या बातम्या-
“लॉकडाऊन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे”
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रूग्ण; तिघांचा गेला बळी
“पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रमुखावर कारवाई करा”
Comments are closed.