Lok Sabha Election 2024 | देशभरात सध्या जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार व टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू यांची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर या दोन नेत्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इंडिया आघाडी आणि भाजप या दोन्ही गटाकडून सध्या पुढील मोर्चेबांधणी केली जात आहे.
या लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला 293 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीने देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे. इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसने यावेळी आपली कामगिरी सुधारत तब्बल 99 जागांवर विजय मिळविला आहे.
भाजपला टीडीपीचा पाठिंबा आवश्यक
अशात एनडीए सरकार बहुमताचा 272 हा आकडा पार करत असली तरी त्यात भाजपाला आपल्या सत्तेसाठी घटक पक्षांच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आता या घटक पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते, असं म्हटलं जातंय.या सर्व गोष्टीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
अशातच तेलुगू देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी (Lok Sabha Election 2024) आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Andhra Pradesh has won!
The people of Andhra Pradesh have won!Today, my heart is filled with gratitude. I thank the people of our state for blessing the TDP-JSP-BJP alliance with an overwhelming mandate to serve them. Together, we have won a battle to reclaim our state, and…
— N Chandrababu Naidu (@ncbn) June 4, 2024
काय म्हणाले चंद्राबाबू नायडू?
“काळजी करू नका. तुम्हाला बातमी हवी आहे. देशात सध्या अनेक राजकीय बदल होताना मी पाहिले आहेत, पण मी एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला चाललोय.तुम्हाला पुढील माहिती कळवली जाईल.”, असं विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी सांगितलं.
दरम्यान, टीडीपीने आंध्र प्रदेशच्या 175 जागांच्या विधानसभेत तब्बल 135 जागा मिळवल्या आहेत.यासोबतच पवन कल्याणच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्यात. लोकसभेमध्ये देखील टीडीपीने 16 जागा जिंकल्या (Lok Sabha Election 2024)आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी टीडीपीचा पाठिंबा आवश्यक असणार आहे.
News Title : Lok Sabha Election 2024 Chandrababu Naidu statement
महत्त्वाच्या बातम्या-
इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ
“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा
भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली
लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’
‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी