अखेर निवडणुकांचं बिगुल वाजलं! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कधी मतदान होणार

Lok Sabha Election 2024 Date l 2024 च्या लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, यावेळी लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे याशिवाय मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रामध्ये तब्बल पाच टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे या तारखांना मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

Lok Sabha Election 2024 Date l महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणुका :

26 एप्रिल 2024
7 मे 2024
13 मे 2024
20 मे 2024
25 मे 2024

Lok Sabha Election 2024 Date l महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा – 19 एप्रिल – भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, बारामती, धाराशीव, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, अहमदनगर, शिर्डी, बीड, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर,

पाचवा टप्पा 20 मे – नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, धुळे, दिंडोरी, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

News Title : Lok Sabha Election 2024 Date

महत्त्वाच्या बातम्या – 

आचारसंहिते संदर्भात प्रत्येक राजकीय नेत्यांसह नागरिकांना ही माहिती असायलाच हवी!

उदयनराजे राजकारणातून संन्यास घेणार का?, केला सर्वात मोठा खुलासा

आचारसंहिता म्हणजे काय? या दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते

तरुणांसाठी खुशखबर; सेबीमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करण्याचं स्वप्न होणार साकार; जबरदस्त फीचर्ससह CNG कार बाजारात येणार