बारामती शरद पवारांचीच! लेकीनं गड राखला, अजित पवार आता मिशा काढणार?

Lok Sabha Election 2024 Supriya Sule won

Lok Sabha Election 2024 | संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुप्रिया सुळे या 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर बारामतीची जागा ही पवार कुटुंबाठी प्रतिष्ठेची बनली होती. येथे प्रथमच पवार विरुद्ध पवार असा झाला. बारामतीची जागा पवार कुटुंबांसाठी अत्यंत महत्वाची बनली होती. अजित पवार यांनी येथे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं.

सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव

अगदी मतदान होईपर्यंत हा मतदार संघ चर्चेत होता. येथे शरद पवार गटाने विजयी मोहोर उमटवली आहे. महायुतीसाठी देखील हा आता धक्का मानला जात आहे.  निकाल लागण्यापुर्वी अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं होतं.  सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असं अजित पवार म्हणाले होते. आता येथे सुळे विजयी झाल्या आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या अजित पवार आपल्या विधानावर ठाम राहणार काय?, याबाबत आता बोललं जातंय.

या निवडणुकीत महाविकास आघाडीने आपली छाप सोडली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत.

सुप्रिया सुळे विजयी

तसंच नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विजय झाला आहे, अमोल कोल्हे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर अजित पवार गटाच्या आढळराव पाटलांचा पराभव झाला आहे.

News Title- Lok Sabha Election 2024 Supriya Sule won

महत्वाच्या बातम्या-

बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; सुनेत्रा वहिणींचा दारूण पराभव

इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर

भाजपला मोठा धक्का!; अहमदनगरमध्ये निलेश लंके आघाडीवर

मोठी बातमी! पहिल्यांदाच राजकारणात उतरलेल्या कंगनाला मोठं यश; उधळला विजयी गुलाल

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .