मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार

Lok Sabha Election Result 2024 | देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल मंगळवारी 4 जून 2024 जाहीर होणार असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

भाजपनं स्वबळावर गाठला 200 चा आकडा

मतमोजणीला सुरूवात झाली मतमोजणीचे कल समोर येत आहेत. भाजपने निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं स्वबळावर 200 पारचा आकडा गाठला आहे. तर महाराष्ट्रात 17 जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे, निकाल अजून आलेला नाही, पण भाजप कार्यकर्त्यांना बहुमत मिळेल आणि PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी खास प्रकारची मिठाई व्हायरल होत आहे. या मिठाईत भाजपचे चिन्ह कमळ आहे. लोक मिठाईसारखे कमळ बनवून वाटप करत आहेत. बिहारमधील भाजप कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयासाठी हवन आणि पूजा केली. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर

बारामतीत कांटे की टक्कर; पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे आघाडीवर

भाजपने गुलाल उधळला; या उमेदवाराने फडकावला विजयाचा पताका

मोठी बातमी! निकाल लागण्यापूर्वीच पेट्रोल-डिझेलचे दर घसरले?

सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!