ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांचं काय झालं?, जाणून घ्या सगळ्यांचा निकाल

Lok Sabha Election Results 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडामुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीने बऱ्याच ठिकाणी आघाडी घेतली आहे. तर, काही ठिकाणी विजयाची मोहोर लावली आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील उमेदवारांनी आपली जादू दाखवून दिली आहे. बंडाला दोन वर्ष लोटल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचं दिसत आहे. कारण मुंबईत ठाकरेंनी लढलेल्या चारपैकी चार जागा जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्रातील 21 पैकी 10 जागांवर आघाडी मिळवली आहे.

त्यातच महायुतीत 15 जागा लढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंसह केवळ चौघांना खासदारकी टिकवण्यात यश आलं आहे. यामध्ये बुलढाणा, मावळ आणि हातकणंगलेचा समावेश आहे.तर नाशिक, शिर्डी, कोल्हापूर आणि मुंबईतील तीन (Lok Sabha Election Results 2024 )जागा शिंदेंनी गमावल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवार पराभवाच्या समीप आहेत.

शिंदे गटाचे विजयी खासदार

बुलढाणा – प्रतापराव जाधव
कल्याण – श्रीकांत शिंदे
मावळ – श्रीरंग बारणे
हातकणंगले – धैर्यशील माने
औरंगाबाद – संदिपान भुमरे (आमदार)
ठाणे – नरेश म्हस्के (माजी महापौर)

शिंदे गटाचे पराभूत उमेदवार

नाशिक – हेमंत गोडसे
शिर्डी – सदाशिव लोखंडे
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
मुंबई दक्षिण – यामिनी जाधव (आमदार)
मुंबई उत्तर पश्चिम – रवींद्र वायकर (आमदार)

पराभवाच्या समीप असलेले उमेदवार

रामटेक – राजू पारवे पराभवाच्या छायेत तर, काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयाच्या वाटेवर
हिंगोली – हेमंत पाटील यांच्याऐवजी (Lok Sabha Election Results 2024 ) बाबुराव कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलं. येथे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या वाटेवर आहेत.
यवतमाळ-वाशिम – ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना विजयी आघाडी
मुंबई उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्याने रवींद्र वायकर यांना तिकीट मिळालं होतं.

News Title : Lok Sabha Election Results 2024

महत्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! जालन्यात रावसाहेब दानवेंचा दारुण पराभव; कल्याण काळे विजयी

मोठी बातमी! वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर राहुल गांधींचा दणदणीत विजय

रायगडने राखली अजित पवारांची लाज; 4 पैकी याच मतदारसंघात उघडलं विजयाचं खातं

महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीसांना जोर का झटका! माढयात मोहिते पाटील विजयी पथावर