ड्रीम गर्ल ते ड्रामा क्वीन..’या’ बॉलीवुड कलाकारांनी राजकीय मैदानही गाजवलं

Lok Sabha Elections 2024 | यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक बॉलीवुड कलाकारांनी मैदान गाजवलं. राजकारणात प्रथमच उतरलेल्या अभिनेत्री कंगनाने हिमाचल प्रदेशमध्ये विजयावर मोहोर लावली. यासोबतच इतर कलाकारांनी देखील अभिनयासोबतच राजकारणातही आपला ठसा उमटवला आहे.

कंगना रनौतपासून अरुण गोविलपर्यंतच्या स्टार्सनी पहिल्यांदाच लोकांची मते जिंकली. निरहुआपासून रवी किशनपर्यंतच्या मोठ्या स्टार्सनी 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत. या लेखात सर्व विजयी कलाकारांची यादी दिली आहे.

‘या’ कलाकारांनाचा झाला विजय

कंगना रनौत : अभिनेत्री कंगना रनौत हीने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. कंगनाने आपल्या गावी मंडीमध्ये केवळ लोकांचा पाठिंबाच मिळवला नाही तर प्रचंड मतेही मिळवली आणि तिने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करून विजय मिळवला.

अरुण गोविल : रामानंद सागर यांच्या रामायणात ‘राम’ ही भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या अरुण गोविल यांनी देखील यावेळी राजकारणात पदार्पण केले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर मेरठमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मेरठ-हापूर लोकसभा मतदारसंघातून अरुण गोविल 10585 मतांनी विजयी झाले.यावेळी भाजपने राजेंद्र अग्रवाल यांचे तिकीट रद्द करत अरुण गोविल यांना उमेदवारी दिली होती.

हेमा मालिनी : अभिनेत्री हेमा मालिनी यांनी (Lok Sabha Elections 2024)मथुरा लोकसभा मतदारसंघात 293407 मतांनी विजय मिळवला आहे. हेमा मालिनी यांनी 16 उमेदवारांचा पराभव करत हा विजय मिळवला आहे.

पवन कल्याण : जनसेना पक्षाचे संस्थापक आणि साऊथ स्टार पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशातील पिथापुरम विधानसभा मतदारसंघातून व्हायएसआरसीपीच्या वंगा गीता विश्वनाथम यांचा पराभव केला आहे.

शत्रुघ्न सिन्हा : आसनसोल लोकसभा मतदारसंघातून अभिनेता आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा विजय झाला आहे. त्यांचा सामना भाजपचे खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एसएस अहलुवालिया यांच्याशी होता.

मनोज तिवारी : भोजपुरी सुपरस्टार आणि ईशान्य दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे उमेदवार मनोज तिवारी यांनी कन्हैया कुमारचा पराभव करून विजय मिळवला आहे.

रवि किशन : अभिनेता रवी किशन (Lok Sabha Elections 2024) याने भोजपुरी ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्याने ‘लापता लेडीज’ मध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. भाजपकडून लढणारे रवि किशन गोरखपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

‘या’ कलाकारांना मिळालं अपयश

हंस राज हंस : पंजाबच्या फरीदकोट लोकसभा जागेवर हंस राज हंस यांचा (Lok Sabha Elections 2024)पराभव झाला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी सरबजीत सिंह खालसा यांनी त्यांचा 298062 मतांनी त्यांचा पराभव केला.

दिनेश लाल यादव : भोजपुरी स्टार निरहुआ म्हणजेच दिनेश लाल यादव यांचा समाजवादी पक्षाच्या धर्मेंद्र यादव यांच्याकडून 161035 मतांनी पराभव झाला आहे.

News Title : Lok Sabha Elections 2024 Bollywood Actors 

महत्त्वाच्या बातम्या- 

आशिष शेलार पडले तोंडावर, किरण मानेंनी व्हिडीओ शेअर करत डिवचलं

राज्यात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

INDIA आघाडीत सहभागी होणार?, चंद्राबाबू नायडू यांनी स्पष्ट केली मोठी भूमिका

“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”

इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ