बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण!

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. ओम बिर्ला यांचा कोरोना रिपोर्ट 19 मार्चला पॉझिटिव्ह आला असून 20 मार्चला त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालय़ात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना 20 मार्च रोजी एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात 43 हजार 846 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांसह देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहोचली आहे. तर देशात सध्या 3 लाख 9 हजार 87 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“बरंच काही बोलून काहीही न सांगणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य”

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये कोसळणार पाऊस!

राम मंदिरामुळे भारत अधिक बलशाली होईल- RSS

पबजी गेमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; PUBG Mobile India लवकरच भारतात लाँच होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More