बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाविषयी शरद पोंक्षे यांचं मोठं वक्तव्य!

मुंबई | अभिनेते शरद पोंक्षे(Sharad Ponkshe) हे स्पष्ट वक्ते आहेत. हिंदूधर्माबबात ते कायम भूमिका मांडत असतात. ते नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानावर वक्तव्य केल्याने सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रपुरूष लोकमान्य टिळकांचा(Lokmany Tilak) जन्म दापोली तालुक्यातील चिखलगाव येथे झाला आहे. आता यावर पोंक्षे यांनी एक मोठंं वक्तव्य केलं आहे. पोंक्षे म्हणाले की, रत्नागिरी शहारात ज्या घरात लोकमान्य टिळकांचा जन्म झाला आहे, असं सांगण्यात येतं, ते ठिकाण काल्पनिक असल्याचं पोंक्षे यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलही  एक वक्तव्य केलं होतं. जेवढा अपमान सावरकरांचा झाला असेल, तेवढा अपमान कोणाचाच झाला नसेल. आता सावरकरांची दशहत वाढली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. सावरकरांची दशहत ब्रटिशांना होती, काॅंग्रेसला आहे पण ती दशहत वाढली पाहिजे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं.

तसेच लहान मुलाला सावकर कळले, पण ते दिल्लीतील पन्नास वर्षाच्या घोड्याला कळले नाहीत, असा टोला त्यांनी नाव न घेता राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना लगावला होता. दरम्यान पोंक्षे यांना विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच संवेदनात्माक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका साकारणारे यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जाते.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळ विस्ताराचं अखेर ठरलं; भाजपकडून 4 ते शिंदे गटाकडून 4 आमदारांना फोन

पीव्ही सिंधूने रचला इतिहास; भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल

राज्यातील ‘या’ भागांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

“तुम्ही स्वाभिमानी असाल तर, महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून सोडवा”

मोठी बातमी! संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More