देशात भाजपला किती जागा मिळणार?, प्रशांत किशोर यांचा नवा धक्कादायक अंदाज

Loksabha Election 2024 | आज 1 जूनरोजी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागेल.देशात भाजप विरुद्ध इंडिया आघाडी असा राजकीय संघर्ष आहे.

या निवडणुकीत भाजपकडून राम मंदिरचा मुद्दा उचलण्यात आला. तर, इंडिया आघाडीने शेतकरी प्रश्न, बेरोजगारी तसंच संविधान बचाव या काही गोष्टींचा प्रचार केला. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा देण्यात आलाय. आता निकालात कुणाला किती जागा मिळणार, ते कळूनच येईल.

भाजप पुन्हा 300 जागा जिंकणार

अशात प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी मोठं भाकीत नोंदवलं आहे. यापूर्वी त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता, आताही ते आपल्या या मतावर ठाम आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने (Loksabha Election 2024)  जितक्या जागा जिंकल्या तितक्या किंवा त्यापेक्षा थोडी जास्त सुधारणा होऊ शकते, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येईल. भाजपला उत्तर आणि पश्चिम भारतात अधिक नुकसान होणार नसल्याचं प्रशांत किशोर यांनी म्हटलंय.

‘या’ राज्यांत भाजपला जास्त फटका बसणार नाही

“पूर्व आणि दक्षिण भारतातून भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढणार आहे. 2019 इतक्याच भाजपाच्या जागा येतील. पूर्व आणि दक्षिणमध्ये लोकांना भाजपाचा अजून अनुभव नाहीये. त्यामुळे ते त्यांना संधी देतील. तामिळनाडू, केरळ या भागातही भाजपाची मतांची टक्केवारी वाढू शकते”, असं (Loksabha Election 2024) मत प्रशांत किशोर यांनी नोंदवलं आहे.

उत्तर आणि पश्चिम भारतात भाजपाला मोठा फटका बसणार नाही. इथला फटका ते दक्षिण आणि पूर्वेतून भरून काढतील. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भाजपाची कामगिरी संतुलित असेल, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. त्यांचं हे भाकीत आता चर्चेत आलंय.

News Title : Loksabha Election 2024 Prashant Kishor Prediction

महत्वाच्या बातम्या- 

अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का, एकही जागा जिंकणार नाही!

शिंदेंना धक्का; उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘इतक्या’ जागा जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रसिद्ध ज्योतिष अनिल थत्तेंची निकालाआधी मोठी भविष्यवाणी, म्हणाले…

अत्यंत आळशी पण तेवढेच बुद्धिमान असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक

काँग्रेस किती जागा जिंकणार?; नाना पटोलेंनी सांगितला आकडा