महाराष्ट्रातील धक्कादायक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया!

Eknath Shinde l महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, देशातील जनतेने दिलेला जनादेश हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास दाखवणारा आहे. तसेच शिंदे म्हणाले, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत.

Eknath Shinde l देशातील जनतेने विकासासाठी मतदान केले – एकनाथ शिंदे

एनडीएचा घटक पक्ष असल्याने शिवसेना सदैव आमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या मार्गावर चालला आहे. पुढील पाच वर्षेही हाच वेग कायम राहील, असा विश्वास मी व्यक्त करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “ठाण्यातील आमचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचंड मोठा विजय झाला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. ते ठाण्याच्या लोकसभेचा विकास करतील. मी सर्वांचे आणि पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करतो, तिसऱ्यांदा या देशातील जनतेला विजय मिळाला आहे. त्या लोकांना सत्तेपासून दूर ठेवून विकासाला मतदान केले.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा विजय :

महाराष्ट्रात भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभेची जागा गमावली आहे.वकील उज्ज्वल निकम हे भाजपच्या तिकीटावर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होते. मतमोजणीत उज्ज्वल निकम यांच्या भवितव्याचा फैसला झाला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे.

सुरुवातीला भाजपचे उज्ज्वल निकम आघाडीवर होते. अखेरच्या फेरीत वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा पराभव केला आहे. अमोल कीर्तिकर मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उद्धव गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा अवघ्या 2000 मतांनी पराभव केला. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव गटाला यश मिळाले आहे.

News Title- Maharashtra Loksabha Elelction Statement In Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या-

भाजपवाले कोणाचेच नाहीत; संजय राऊतांच विधान चर्चेत

‘बच्चा बडा हो गया’, सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं

धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा धमाका; ओमराजे निंबाळकर विजयी

“बाप बाप होता है, आता देवेंद्र फडणवीसांना समजलं असेल”

उदयनराजे भोसलेंना रडू कोसळलं, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष